शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त चिंचवडला होणाऱ्या मेळाव्यात खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, तसेच शिवगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
रामकृष्ण मोरे नाटय़गृहात दुपारी साडेचार वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात संजय राऊत यांची सुधीर गाडगीळ प्रकट मुलाखत घेणार आहेत. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित राहणार आहेत. उद्योगनगरीतील ५१ ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय जयंत जाधव, कैलास पुरी, भानुदास हिवराळे, चिंतामणी मनोहर यांना ‘शिवगौरव माध्यम पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती शहरप्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे यांनी दिली.

Story img Loader