मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका मांडल्यावर पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना शहर अध्यक्ष पदावरून बाजूला व्हावे लागले. वसंत मोरे वारंवार पक्षांतर्गत होणार्‍या घडामोडीवर देखील नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. त्याच दरम्यान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता नवीन चर्चा सुरु झाल्या आहेत.

पुण्यातील शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता ठोसर यांच्या मुलाच्या लग्नाला संजय राऊत आले होते. त्यावेळी मनसेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांची भेट झाली. दोन्ही नेत्यामध्ये यावेळी चर्चा देखील झाली. यामुळे वसंत मोरे हे मनसेमधून शिवसेनेत जाणार का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

या भेटीबद्दल वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी एका लग्न सोहळ्याकरता गेलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे तेथे होते. त्यांनी संजय राऊत यांना म्हटले की,वसंत मोरे इथे आहेत. त्यांनी मी ठाण्यातील तात्याचं भाषण ऐकल,खूप छान भाषण केलं. आता आरक्षण सोडत झाली,कशी झाली आहे, अशी विचारणा केली. आमच्यामध्ये चांगली चर्चा झाली. तसेच त्यांनी माझ्या कामांच कौतुक करत तात्यांची भेट दुर्मिळ झाली असल्याचे संजय राऊत म्हणाले.”

दरम्यान, यानंतर वसंत मोरे मनसेमधून शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. त्यावर तेमी कुठेच जाणार नसल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे.