Shivsena Uddhav Thackeray VS NCP Sharad Pawar : पुण्यातील विधानसभेच्या अनेक जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याल्या आल्या आहेत. यापैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी दिली आहे, तर चिंचवड मतदारसंघात राहुल कलाटे व भोसरीमधून अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षाकडे गेल्यामुळे पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघांमधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले आहेत आणि त्यांनी बंडाचं निशाण देखील फडकावलं आहे. या तिन्ही मतदारसंघांमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज एक महत्त्वाची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत तिन्ही मतदारसंघांमध्ये बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत.

शिवसैनिकांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर याबाबत शिवसेनेचे (ठाकरे) शहराध्यक्ष सचिन भोसले म्हणाले, “पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार देण्यात आले आहेत. तिन्ही उमेदवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. आमचं म्हणणे एवढंच आहे की आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही महाविकास आघाडीचं काम करणार नाही”.

latur district, Congress Deshmukh family, Nilangekar family
काँग्रेसमध्ये देशमुख यांना एक न्याय व निलंगेकरांना दुसरा याबद्दल असंतोष
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
rajan vichare
‘गद्दारांना क्षमा नाही’ आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या, ठाण्यात निष्ठावान शिवसैनिकांचे शक्तीस्थळावर गाऱ्हाणे, राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज
Maharashtra elections
अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमदेवारी; माहीममध्ये होणार तिरंगी लढतं!
Hadapsar, nana bhangire, activists on the streets,
नेत्याच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत शिवसैनिक पायी निघाले, वाचा सविस्तर…
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : “डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला, पण मी त्यांना म्हटलं आधी…”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
Baba Siddique Shot Dead at Bandra Mumbai Breaking News Updates in Marathi
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या दोन मारेकऱ्यांना अटक करणाऱ्या १० पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस?
youths demand seat in Maharashtra Assembly Election
तरुणांना निवडणूक खुणावतेय, मात्र भवितव्य अधांतरी! प्रा. बदखल, डॉ. खुटेमाटे, बंडू धोतरे, डॉ. गावतुरे, ॲड. घोटेकर संधीच्या शोधात

हेही वाचा : NCP Candidate 3rd List : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली उमेदवारी?

शिवसैनिकांचं म्हणणं काय?

सचिन भोसले यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही महाविकास आघाडीविरोधात, प्रामुख्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधात एवढी आक्रमक भूमिका का घेत आहात? त्यावर भोसले म्हणाले, “आम्हाला न्याय मिळत नाहीये. आम्ही आमचं गाऱ्हाणं उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडलं. उद्धव ठाकरे यांनी आमचे मुद्दे ऐकून घेतले व म्हणाले, ‘हा विषय आम्ही चर्चेला घेऊ’. पक्षाचे नेते वरिष्ठ स्तरावरील बैठकांमध्ये मुद्दे मांडत असतात. भूमिका मांडतात, परंतु त्या मांडल्यावरही पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांवर अन्याय होतच आहे. ज्या मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) मजबूत आहे तिथे शिवसेनेलाच उमेदवारी द्यायला हवी”.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : गरज पडल्यास कुणाचा पाठिंबा घेणार? शरद पवार की उद्धव ठाकरे? फडणवीस म्हणाले, “आम्ही फक्त..”

शिवसैनिक राष्ट्रवादीचा (शरद पवार) प्रचार न करण्यावर ठाम

सचिन भोसले म्हणाले, “आम्ही इतकी वर्षे पक्षासाठी काम करत आहोत. आमच्यातील एखाद्याला उमेदवारी मिळावी अशी निष्ठावंतांची अपेक्षा आहे. याबाबत आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. आम्ही परत एकदा त्यांना विनंती करणार आहोत. तरी शेवटची एकच गोष्ट सांगतो या तिन्ही मतदारसंघांबाबत जो काही निर्णय झाला आहे तो आम्हाला मान्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा एकही पदाधिकारी पिंपरी, चिंचवड आणि भोसरीमध्ये राष्ट्रवादीच्या (शरद पवार) उमेदवारांचा प्रचार करणार नाही. आम्हाला न्याय मिळत नाही. आमच्या भावना ऐकून घेतल्या जात नाहीत, तोवर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू.”

दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) नेते व माजी आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, “संधी मिळाल्यास मी स्वतः देखील येथून निवडणूक लढवू शकतो”. चाबुकस्वार यांनी २०१४ व २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती.