शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केल्याचा निषेध म्हणून पिंपरी-चिंचवड शिवसेनेने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्यास ‘जोडे मारो’ आंदोलन केले. उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, गटनेत्या सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली निगडीतील टिळक चौकात झालेल्या आंदोलनात शहरप्रमुख राहुल कलाटे, योगेश बाबर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, संगीता पवार, संगीता भोंडवे, चारूशीला कुटे, विमल जगताप आदी सहभागी झाले होते. पराभवातून आलेल्या नैराश्यातून तसेच केवळ प्रसिध्दीसाठी राणे हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्यावर होणारी टीका शिवसैनिक सहन करणार नाही, असे शहर शिवसेनेने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsenas agitation against narayan rane