Pune Bus Fire : पुण्यात आज(मंगळवार) आणखी एक आगीची घटना घडली आहे. शहरातील शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या अगोदर सकाळी एका हॉटेलला आग लागली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की पाहा – PHOTOS : पुण्यात लुल्लानगर परिसरात सातव्या मजल्यावरील ‘Vegeta’ हॉटेल जळून खाक

सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले होते. भर ररस्त्यात ही बस पेटल्याने एकच खळबळ उडाली होती आणि रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती.

हेही वाचा : पुण्यातील लुल्लानगरमधील हॉटेलला आग; घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या चार गाड्या दाखल

या आगीत बसचा समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. पुण्यातील अत्यंत रहदारीचा असा हा शास्त्रीनगर परिसर आहे आणि याच परिसरातील रस्त्यावर शिवशाही बसला आग लागली. एम एच ०६ डी डब्ल्यू ०३१७ क्रमांकाची ही शिवशाही बस यवतमाळ-औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत होती. आज सकाळी येरवाड्यातील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटल जवळ ही बस आली असता तिने अचानक पेट घेतला. शिवाजीनगर बस डेपोकडे ही बस जात असताना ही दुर्घटना घडली.

तर प्राप्त माहितीनुसार यवतामाळहून निघाल्यापासून ही बस वारंवार गरम होत होती. मात्र तशा अवस्थेत ती पुण्याला आली. सुदैवाने सर्व प्रवासी खराडी येथे उतरले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivshahi bus caught fire at shastrinagar chowk in pune msr