पुणे : गणेशोत्सव आणि ढोल-ताशावादन ही अस्सल मराठी मातीतली कला महाराष्ट्रापासून हजारो मैलांवर असलेल्या अमेरिकेतील मिशिगन राज्यात रुजवण्याचे काम ‘शिवशार्दूल पर्कशन्स’ या ढोल-ताशा पथकाने केले आहे. अस्सल पारंपरिक वादनाचा सात मजली गजर करत मराठी पताका उंच फडकावत ठेवणाऱ्या या पथकाची यंदा यशस्वी दशकपूर्ती होत आहे. या पथकाची ख्याती केवळ मिशिगन नव्हे, तर आसपासच्या सर्व राज्यात पसरली असून खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने या पथकाचे वादन अनुभवण्यासाठी नेमाने येणारे कित्येकजण त्याची साक्ष देतात.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत ढोल आणि ताशा या मंगलवाद्यांना खास महत्त्व आहे. गणेशोत्सव हा ढोलताशाच्या वादनाशिवाय अपुरा वाटावा इतकी ही प्रथा मराठी मनात खोलवर रुजली आहे. कोणतीही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी त्याविषयीचा अभिमान आणि प्रेम असणे पुरेसे नसते, तर तिची तोंडओळख पुढच्या पिढीला सातत्याने करून देणे तितकेच किंवा त्याहून अधिक महत्त्वाचे असते. याच तळमळीतून २०१४ मध्ये डेट्रॉईट येथे स्थायिक असलेले अनंत केंदळे यांनी पथकाची मुहूर्तमेढ रोवली. परदेशात दैनंदिन व्याप सांभाळून ढोलताशा पथक स्थापन करण्याचे शिवधनुष्य पेलणे अर्थातच सोपे नव्हते. मात्र अमाप इच्छाशक्तीच्या बळावर अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी वेळोवेळी मार्ग काढत पथक जिवंत ठेवले. यामध्ये त्यांना अजित कुलकर्णी आणि तुषार देसले यांची साथ मिळाली.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

हेही वाचा >>> Ganesh Immersion Preparations :विसर्जन मिरवणुकीसाठी कार्यकर्त्यांची लगबग; मानाच्या गणपती मंडळांची पथके निश्चित

केवळ सात ढोल आणि दोन ताशे एवढ्या मर्यादित वाद्यांच्या भांडवलावर सुरू झालेल्या पथकाने अल्पावधीत तमाम मिशिगनवासीयांना वेड लावले. आजमितीला पथकाची ख्याती मिशिगनमध्ये सर्वदूर पसरलेली दिसते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात संयोजकांच्या आग्रहाला मान देऊन एका दिवसात तीन ते चार मिरवणुकांमध्ये वादन करण्याचे अनेक अनुभव पथकाच्या गाठीशी आहेत. प्रत्येक वादनाच्या सुरुवातीला होणारा शंखनाद, त्यानंतर ताशावर पडणाऱ्या काड्यांचा कडकडाट, आभाळाला गवसणी घालत नाचवले जाणारे भगवे ध्वज, अंगावर रोमांच आणणारी तुतारीची बुलंद ललकारी आणि त्यापाठोपाठ वाजणारे ढोल याने वातावरणात निर्माण होणारी स्पंदने केवळ शब्दातीत आहेत. करोना टाळेबंदीच्या काळात ऑनलाईन पद्धतीने वादन करुन पथकाने आपले सातत्य टिकवून ठेवले. मराठीबरोबरच इतर भाषिकांनाही पथकाच्या सात मजली गजराने भुरळ घातली. पारंपरिक ढोलताशाच्या या जादूपासून स्थानिक अमेरिकन नागरिकसुद्धा लांब राहू शकले नाही. भाषा, प्रांत आणि समाजाची सर्व बंधने पार करून परदेशात लोकाश्रय प्राप्त करणे ही अभिमानास्पद बाब आहे.

हेही वाचा >>> पुण्यात शिंदे गटाच्या वाट्याला केवळ एकच जागा ?

ताजेपणा जपण्यासाठी नवे प्रयोग

कलेतील ताजेपणा जपण्यासाठी त्यात नवनवे प्रयोग करत राहणे अत्यावश्यक असते. पथकाच्या वादनात पारंपरिकेबरोबरच तरुणाईला भावतील असे नवीन प्रयोग केले. सात-आठ वर्षांच्या मुलापासून ते ज्येष्ठ नागरिक असे ७० हून अधिक वादक आपुलकीने पथकासोबत जोडले गेले आहेत. भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या भव्य मिरवणुकीत पथकाने हजेरी लावून शेकडो उपस्थितांची मने जिंकली. एवढेच नव्हे, तर डेट्रॉईट येथील जन्माष्टमीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आग्रहाने पथकाला दर वर्षी आमंत्रित केले जाते, असे अनंत केंदळे यांनी सांगितले.

Story img Loader