मालमत्तेच्या वादातून नातवाने आजीचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सावत्र आई, वडील यांच्याशी संगनमत करुन नातवाने आजीचे अपहरण केले असून या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वीस वर्षीय नातवाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अपहृत महिलेच्या विवाहित मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंढव्यातील केशवनगर भागात ज्येष्ठ महिला राहायला आहे.
तक्रारदार महिलेची आई आणि वडील दोघे शासकीय नोकरदार होते. दोघे जण सेवानिवृत्त झाले आहेत. वीस वर्षीय नातू आजीकडे दागिने आणि पैशांची मागणी करत होता. त्याच्या वडिलांनी आईकडून पैसे घेतले होते. मालमत्तेवरुन नातू, त्याचे वडील आणि सावत्र आई आईशी वाद घालत होते. आरोपींनी संगमत करुन आईचे अपहरण केल्याचे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.