पिंपरी : चिंचवडमध्ये एक अनोख्या हत्येच प्रकरण समोर आलं. ज्यामुळे पोलीस देखील हैराण झाले होते. आधी आत्महत्या वाटणारी घटना अचानक हत्येत बदलली. शहरातील वाकड परिसरात मानलेल्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेमध्ये आरोपी लोकेंद्र किशोर सिंह ला अटक करण्यात आली आहे. निकेत कुणाल असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. त्याने मद्यधुंद असलेल्या मैत्रिणीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याबाबतची माहिती पीडित तरुणीने मानलेला भाऊ लोकेंद्रला दिली. लोकेंद्र आणि निकेत कुणाल यांच्यात जबर भांडण झालं. लोकेंद्र ने निकेत कुणाला विटेने मारहाण केली. भिंतीवर डोकं आदळलं होत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकेंद्र किशोर सिंह, हत्या झालेला निकेत कुणाल आणि पीडित तरुणी हे सर्व ओळखीचे असून मित्र आहेत. पूर्वी निकेत कुणाल आणि पीडित तरुणीसोबत आरोपी लोकेंद्र हा देखील नोकरी करायचा. सध्या मात्र निकेत कुणाल आणि पीडित तरुणी हे एका कंपनीत काम करत होते. दिनांक ३ एप्रिल रोजी कंपनीची पार्टी असल्याने निकेत कुणाला आणि पीडित तरुणी एकत्र आले होते. दोघांनी त्या पार्टीमध्ये मद्यपान केले.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल

हेही वाचा…पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित

तरुणी (मैत्रीण) जास्त मद्यपान अवस्थेत होती. त्याचबरोबर निकेत कुणाल हा देखील दारू प्यायला होता. पीडित तरुणीने निकेत कुणाल ला स्वतःच्या फ्लॅटवर सोडण्यास सांगितले. निकेत कुणालने तसं न करता त्याने मैत्रीण असलेल्या तरुणीला स्वतःच्या फ्लॅटवर घेऊन गेला. मद्यधुंद अवस्थेत असल्याचा फायदा घेऊन निकेत कुणालने मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. याबाबतची माहिती दुसऱ्या दिवशी पीडित तरुणीला (मैत्रिणीला) समजली तिने निकेत कुणाल सोबत भांडण देखील केलं. ती त्या ठिकाणाहून तिच्या फ्लॅटवर गेली. यासंबंधीची माहिती मानलेला भाऊ लोकेंद्राला दिली. लोकेंद्र मानलेल्या बहिणीसह निकेतच्या फ्लॅटवर गेला. पीडित तरुणी पार्किंगला थांबलेली होती. लोकेंद्र आणि निकेतन यांच्यात जबरदस्त भांडण झालं. लोकेंद्रने निकेत कुणालच्या डोक्यात विटेने मारहाण केली. त्याचबरोबर त्याचं डोकं भिंतीवर आदळलं. तिथून लोकेंद्र निघून गेला. गंभीर जखमी झालेला निकेत कुणाल खासगी रुग्णालयात गेला, त्या ठिकाणी उपचार घेऊन परत घरी आला. निकेत हा फ्लॅटमध्ये राहत होता. त्याचबरोबर त्याच्यासह दुसरा मित्र मास्टर बेडरूममध्ये राहत होता.

हेही वाचा…घटनाकारांची छबी, स्वाक्षरी आता लेखणीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण

निकेत कुणाल हा विचारात गुंतला होता. त्याने मैत्रीण असलेल्या तरुणीसोबत दारूच्या नशेचा गैरफायदा घेऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले होते. मैत्रीण आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. आपली बदनामी होईल. या भीतीने निकेत कुणालने गळफास घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी निकेत कुणालचा मित्र मास्टर बेडरूमधून बाहेर आल्यानंतर निकेत कुणालने गळफास घेतल्याचं निदर्शनास आले. मित्राने निकेतला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आधी गळफास घेऊन निकेत कुणालने आत्महत्या केली. असा संशय हिंजवडी पोलिसांना होता. तशी नोंद पोलिसांनी केली. परंतु, पोस्टमार्टम केल्यानंतर निकेत कुणालचा मृत्यू हा डोक्यात गंभीर इजा झाल्याने झाल्याचे निष्पन्न झालं. पोलिसांनी तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवत आरोपी लोकेंद्र किशोर सिंह पर्यंत पोहचत अटक केली आहे.