पुणे: किशोर आवारे हत्येप्रकरणी आत्तापर्यंत सात जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये आणखी ट्वीस्ट आला असून माजी नगरसेवक भानू खळदे हे मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजतात भानू खळदे हा पसार झालेला असून त्याचा शोध पिंपरी- चिंचवड पोलीस घेत आहेत.

१२ मे २०२३ रोजी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याघटनेमुळे पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या प्रकरणी तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली. अगोदर वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेने हत्या घडून आणल्याचं समोर आलं होतं. परंतु, या प्रकरणात आणखी ट्वीस्ट आला असून माजी नगरसेवक भानू खळदे यांनी हे सगळं घडवून आणलं असून ते मास्टरमाइंड असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी सांगितला आहे. सर्वांसमोर केलेला अपमान आणि पुन्हा किशोर आवारे हे मारणार असल्याच्या भीतीपोटी हत्या घडवून आणल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात आरोपींना पिस्तुल पुरवणाऱ्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु, मुख्य सूत्रधार भानू खळदे फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय भयमुक्त होण्यासाठी पोलिसांना विशेष सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.

Beed sarpanch murder case Walmik Karad charged under MCOCA in Marathi
Walmik Karad MCOCA : मोठी बातमी! वाल्मिक कराडवर मकोका; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
Gurpatwant Singh Pannun Assassination Plot
“सात महिन्यांपासून तुरुंगात, भारतीय दूतावासातून कोणी…”, गुरपतवंत पन्नूच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या निखिल गुप्तांची मोठी माहिती
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी

आणखी वाचा-पुणे: ऑनलाइन टास्कच्या आमिषाने संगणक अभियंत्याला गंडा

पोलीस आयुक्तांचे विशेष आदेश आणि सूचना…

किशोर आवारे हत्येप्रकरणी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आज क्राइम मीटिंग घेऊन तळेगावात शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तसेच, गुन्हेगारांवरती वचक ठेवण्यासाठी काही एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. गुंडविरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट पाच यांना तळेगावमध्ये ठाण मांडून संशयित गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितले असून वेळ पडल्यास कठोर कारवाई करण्याचे सूचना पोलीस आयुक्त चौबे यांनी दिल्या आहेत.

Story img Loader