पुणे: सोसायटीतील दुकानदाराने दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाजी महिपती कोंडेकर (वय ५५, रा. धायरी) असे गुन्हा दाखल केलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. याबाबत मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंडेकर याचे दुकान सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत आहे. या सोसायटीत कोंडेकरचे दुकान आहे. तक्रारादार महिला सोसायटीत राहायला आहे.

हेही वाचा… पुणे: सुनेशी अश्लील वर्तन; सासऱ्यावर गुन्हा

सोसायटीतील गच्चीची चावी घेण्यासाठी कोंडेकर महिलेच्या घरी आला होता. महिला आणि तिची दहा वर्षांची मुलगी घरात होती. महिला चावी आणण्यासाठी गेली. तेवढ्यात कोंडेकरने मुलीशी अश्लील कृत्य केले. मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopkeeper sexually assaulted a ten year old girl in the sinhagad road area pune rbk 25 dvr