खडकी बाजारात खरेदी करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ६५ हजारांचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना घडली.याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि तिची आई खडकीतील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेथील एका सराफी पेढीत दोघी गेल्या. खरेदी करुन बाहेर पडल्यानंतर चोरट्याने गर्दीत ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून पोलीस कर्मचारी संदेश निकाळजे तपास करत आहेत.