लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी: पर्यावरण विभागाशी संबंधित आभासी बैठकीला गैरहजर राहणे महापालिकेचे पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांना चांगलेच भोवले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी कुलकर्णी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, ४८ तासांत खुलासा मागविला आहे.

पर्यावरण विभागांतर्गत येणाऱ्या वेस्ट टू एनर्जी व इतर प्रकल्पांच्या नियोजनाबाबत महापालिकेत आभासी बैठक आयोजित केली होती. बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या असताना सहशहर अभियंता कुलकर्णी बैठकीला हजर राहिले नाहीत, याची गंभीर दखल घेत आयुक्त सिंह यांनी कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान, यापूर्वीही २९ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणविषयक कार्यशाळेला कुलकर्णी गैरहजर होते. त्या वेळीदेखील त्यांना नोटीस बजावण्यात आली होती.