‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगांवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार’ यंदा पर्यावरण कार्यकर्ते आणि लेखक दिलीप कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये रोख, मानपत्र आणि
स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
माणूस प्रतिष्ठानच्या अध्यक्ष वंदना भाले यांनी ही माहिती दिली आहे. कुलकर्णी दापोलीतील कुडावळे गावात वास्तव्यास असून तेथील देवराई जगविण्याच्या प्रयत्नात ते कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणाबाबत जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी ‘गतिमान संतुलन’ या नियतकालिकातून तसेच ‘निसर्गायन’, ‘सम्यक विचार’, ‘दैनंदिन पर्यावरण’ अशा सुमारे वीस प्रकाशनांमधून आपले विचार मांडले आहेत.
वनस्पती शास्त्रज्ञ श्री. द. महाजन यांच्या हस्ते २० फेब्रुवारीला या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. बी. एम. सी. सी. रस्त्यावरील मराठवाडा मित्रमंडळाच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी शेखर नानजकर कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतील. तसेच शलाका सोमण यांनी प्रतिष्ठानकडे ठेवलेल्या देणगीतून पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्रपत्रविद्या विभागात शिकणाऱ्या अशोक अबूज या विद्यार्थ्यांला पंधराशे रुपयांची शिष्यवृतीही या वेळी प्रदान करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा