पुण्यासह अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सोमवारी सकाळी डॉ. बालाजी तांबे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक भाविक यावेळी गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित होते. परंपरेप्रमाणे ‘श्रीं’ची गणपती मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. तांबडी जोगेश्वरी, शनिपार, टिळक पुतळामार्गे ही मिरवणूक उत्सव मंडळात आणण्यात आली. तिथे सकाळी साडे दहाच्या सुमारास विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
आणखी वाचा