सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांमध्ये यंदा लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास साडेपाच हजार कमी अर्ज आले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विद्यापीठाच्या विविध शाखांतील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र मिळून एकूण १७४ अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांसाठी एकूण ७ हजार ८५० जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा आजपासून (२१ जुलै) सुरू होत आहे. १७४ अभ्यासक्रमांपैकी त्यापैकी ९३ अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा २१ ते २४ जुलै दरम्यान होईल. राज्यासह भारतभरातील २२ केंद्रांवर पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठीची ऑनलाइन परीक्षा होईल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असेल. क्षमतेपेक्षा कमी अर्ज आलेल्या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना कळवण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी मिळून एकूण २१ हजार ६७० अर्ज आले आहेत. तर गेल्या वर्षी २७ हजार ५२५ अर्ज आले होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५ हजार ८५५ अर्ज कमी आल्याचे स्पष्ट होते.

Five times increase in admission fee in private AYUSH colleges
खासगी आयुष महाविद्यालयांमधील प्रवेश शुल्कात पाच पट वाढ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…
VIDYAADAN SAHAYYAK MANDAL THANE
सर्वकार्येषु सर्वदा : हुशार, गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचा निरंतर यज्ञ
Mumbai University, Winter Session Exams,
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २३ ऑक्टोबरपासून
medical admission, list of medical courses,
वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली यादी शनिवारी जाहीर होणार, प्रवेशासाठी ३९ हजार विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम
cet for admission to postgraduate engineering courses
पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी
Recruitment professors Pune University,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या १३३ जागांवर भरती, अर्ज प्रक्रिया कधीपासून?

करोना प्रादुर्भावानंतर परजिल्हा, परराज्यांतील आणि परदेशांतील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तुलनेने कमी असल्याचे जाणवते. करोनाची भीती अजूनही काही प्रमाणात आहे. तसेच करोनामुळे गेल्या दोन वर्षांतील आर्थिक अडचणींचेही सावट कमी प्रवेश अर्जांवर आहे. मात्र स्थानिक विद्यार्थ्यांचा प्रवेशांसाठी ओढा असल्याने त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत चुरस आहे.– डॉ. संजीव सोनावणे, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

यंदाच्या प्रवेश परीक्षेसाठीचे अभ्यासक्रमनिहाय आलेले अर्ज
पदवी – ७४८
पदव्युत्तर पदवी. – १८२७०
पदविका. – ७२५
पदव्युत्तर पदविका – ९०९
प्रमाणपत्र अभ्यासक्रम – १०१