पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून पाऊस कायम राहिल्याने पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांत मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा जमा झाला. गेल्या वर्षीच पाणीसाठा २.७६ अब्ज घनफूट एवढा होता. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ५८ मिलिमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली.

राज्यासह जिल्ह्यात सर्वदूर माॅन्सून सक्रिय झाला आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातही गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत ४.१६ अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा जमा झाला होता. त्यामध्ये गेल्या चोवीस तासांत किंचित वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत १.५० अब्ज घनफूट एवढा जास्त पाणीसाठा आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिवसभरात खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मिलिमीटर, पानशेत धरण परिसरात ५५ मिमी, वरसगाव आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे ५८ आणि ३० मिमी पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली.

Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम