पुणे : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महायुती सरकार विरोधात राज्यभरात महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान आज अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे शहरातील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ बसून मूक आंदोलन करण्यात आले. राजे आम्हाला माफ करा..! , राजे तुम्ही ३५० वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले शाबूत आहेत पण आत्ताचे पुतळे…! निष्क्रिय शासकीय यंत्रणांचा धिक्कार असो! या आशयाचे मजकूर असलेले फलक घेऊन कार्यकर्ते मूक आंदोलनात सहभागी झाले होते.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…
gulabrao deokar loksatta news
शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट

आणखी वाचा-कल्याणीनगर अपघात प्रकरण : मुलाविरुद्ध सज्ञान समजून खटला चालविण्याची पोलिसांची मागणी

यावेळी दीपक मानकर म्हणाले की, मागील आठ महिन्यापुर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण तीन दिवसांपूर्वी पुतळा कोसळण्याची घटना घडली आहे. यामुळे माझ्यासह देशभरातील सर्व शिवशक्तच्या मनात तीव्र नाराजी आणि दुसर्‍या बाजूला संताप व्यक्त होत आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले आज देखील सुस्थिती आहे. पण आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारलेला पुतळा कोसळतो. यावरून त्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे. तसेच आम्ही सरकारमध्ये असलो, तरी छत्रपती शिवाजी महाराज हे आमची पहिली अस्मिता आहे. त्यामुळे आम्ही आज मूक आंदोलन करित आहोत, आता राज्य सरकार यापुढील काळात पुतळा उभारताना विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader