६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला काल पासुन मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैदानावर सुरूवात झाली. तर आज दुसर्या दिवशी बनारस घराण्याच्या नामवंत गायिका रिता देव यांच्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग मधुवंती ने केली. त्यांनी आपल्या गायकीतून ‘मधुवंती’रागाचे सौंदर्य उलगडून दाखविले. विलंबित ख्याल सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने देखील जिंकली. तबलजी आणि त्यांच्या जुगलबंदीला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कामत (तबला), मिलिंद कुलकर्णी(हार्मोनियम), अनुजा भावे, वैशाली कुबेर(तानपुरा) यांनी साथसंगत केली.
आणखी वाचा