पुणे : ज्येष्ठ गायक संगीत भूषण पं. राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र, गायक, संवादिनी आणि ऑर्गनवादक पं. संजय मराठे (वय ६८) यांचे रविवारी रात्री निधन झाले.

हेही वाचा – पुणे : शेवगा स्वस्त; गृहिणींना दिलासा, गुजरातमधून आवक वाढली

हेही वाचा – ९२ वर्षीय वृद्धाची कर्करोगावर मात अन् शस्त्रक्रियेनंतर चारच दिवसांत घरी! आधुनिक उपचार पद्धतीविषयी जाणून घ्या…

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा गायक भाग्येश मराठे, प्राजक्ता मराठे, नातवंडे असा परिवार आहे. पं. राम मराठे यांच्या नुकत्याच झालेल्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमांत संजय मराठे यांचा मुख्य सहभाग होता. धाकटे बंधू गायक मुकुंद मराठे यांच्यासह त्यांनी ‘संगीत मंदारमाला’ हे संगीत नाटक जन्मशताब्दी वर्षांत रंगभूमीवर आणले होते. आज देखील त्याचे प्रयोग जोरदार सुरू आहेत.

Story img Loader