लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: वडगांव जलकेंद्र येथील विद्युत वाहिनीच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून गुरुवारी (११ मे) करण्यात येणार आहे. त्यामुळे वडगांव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंगचा पाणीपुरवठा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर सिंहगड रस्ता आणि सहकारनगर परिसराला उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग दोन वरील परिसर, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर आणि दाते बस थांबा परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sinhagad road sahkarnagar katraj water supply will be closed on thursday in pune print news apk 13 dvr