शहरातील बहुतेक सर्व सायकल मार्गाची दुरवस्था झालेली असताना आणि अस्तित्वातील सायकल मार्गाचा अपेक्षित वापर होत नसतानाही उधळपट्टीचा नवा सायकल मार्ग महापालिकेने शोधला आहे. सिंहगड रस्ता ते हडपसर या अठरा किलोमीटर अंतराच्या परिसरात समर्पित सायकल मार्ग तयार करण्याचे नियोजित आहे. मुळातच अरूंद असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) सायकल मार्ग बांधणीसाठी जागा नसताना आणि प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सुरू असताना सायकल मार्ग कुठे करणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

हेही वाचा >>>पुणे: कोव्हिशिल्डची अद्याप प्रतीक्षा; कोव्हॅक्सिन लशीचा पुरेसा साठा

New road from private land to exit Virar station platform
विरार फलाटावरून बाहेर पडण्यासाठी खासगी जागेतून नवीन रस्ता; अडथळ्यातून प्रवाशांची सुटका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Versova-Bhyander Coastal Road Project, contracts ,
वर्सोवा-भाईंदर किनारपट्टी मार्ग प्रकल्पाचे गौडबंगाल, महापालिका अधिकाऱ्यांकडून २२ हजार कोटींची खैरात
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
Heavy Vehicles Ban on Ghodbunder Road for metro work
घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांनी काढली अधिसुचना
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…

महापालिकेच्या पथ विभागाने स्वारगेट ते खडकवासला या दरम्यान सायकल मार्ग करण्यासाठीची निविदा प्रक्रिया काही दिवासंपूर्वी राबविली होती. सायकल योजना गुंडाळलेली असतानाही त्याअंतर्गत सायकल मार्गाच्या नावाखाली होणारी ही उधळपट्टी वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने सायकल वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत महापालिकेने सायकल एकात्मिक विकास आराखडा केला आहे. हा आराखडा कागदावरच आहे. त्यातच स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेली भाडेतत्त्वावरील सायकल योजनाही गुंडाळली आहे. मात्र असे असतानाही सायकल मार्गाच्या नावाखाली उधळपट्टीचा घाट घालण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे: महापालिकेची रुग्णालये सज्ज; शहरातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात

सिंहगड रस्त्याचा विचार केला तर सायकल मार्ग करण्यासाठी रस्त्यावर जागा नसल्याची वस्तुस्थिती आहे. राजाराम पुलापासून पुढे वडगांव उड्डाणपुलापर्यंतचे पदपथ विक्रेत्यांनी व्यापले आहेत. त्यातच फनटाइम चित्रपटगृह ते राजाराम पूल या दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पदपथांची रुंदी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सायकल मार्ग कुठे करणार हा प्रश्न उपस्थित आहे. या कामासाठी ६६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.सध्या या मार्गासाठी विविध प्रकारची मंजुरी मिळविण्यासाठीचा पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झालेली नाही, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: पर्वती, पद्मावती भागातील ग्राहकांना सदोष वीजदेयके; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची कबुली

महापालिकेने यापूर्वी केंद्राच्या तत्कालीन जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनर्निमाण योजनेअंतर्गत सायकल मार्ग उभारले. यानंतर एकात्मिक विकास आराखडय़ात गेल्या चार वर्षांत महापालिकेला जेमतेम २४ किलोमीटर लांबीचे मार्ग उभारता आल्याची वस्तुस्थिती आहे. शहरात सध्या ११० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग आहेत. त्यांचीही दुरवस्था झाली आहे. सायकल योजना गुंडाळली गेली आहे. सायकल मार्गामध्ये सलगता नाही. मार्गावर अतिक्रमणे झाली आहेत. सातारा रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कर्वेनगर रस्ता, कोथरूड या भागातील सायकल मार्गाचा वापर होत नसल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे.

कर्वे रस्त्यावर पादचारी आणि सायकल मार्ग
कर्वे स्त्यावर खंडूजीबाबा चौक ते रसशाळा चौक या दरम्यान पादचारी मार्ग आणि सायकल मार्गाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ४१ लाख ५६ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित असून तसा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. अर्बन स्ट्रीट डिझाइनच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार सायकल मार्ग आणि पदपध प्रशस्त करण्याची कामे करण्यात येणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दोन मीटर रुंदीचा पादचारी मार्ग आणि १.७ मीटर रुंदीचा सायकल मार्ग प्रस्तावित आहे.

Story img Loader