बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> गुंडाकडून दोन पिस्तूले, सहा काडतुसे जप्त; बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात कारवाई

या सर्व घडामोडी दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौर्‍यावर होते.त्यावेळी पुणे शहरातील अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अनिकेत देशमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,मी या प्रकरणात लक्ष घातल असून सर्वांना नीट करणार, कोणालाही सोडणार नाही.तसेच या प्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश दिल्याचे यावेळी त्यांना सांगितले.