पुणे : ‘देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील (चीनबरोबरील) परिस्थिती स्थिर असली, तरी संवेदनशीलही आहे. उत्तर सीमेवर अत्याधुनिक उपकरणे आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास लष्कर सज्ज आणि सक्षम आहे,’ अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी दिली.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक आणि अमरनाथ यात्रा शांततेत पार पडणे हे जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे निदर्शक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Jayant Patil regret reaction on very small size of opposition
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधकांचा आकार एकदम छोटा, जयंत पाटलांकडून खंत
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Image of a person holding a kite string or a bike with a caution sign
Chinese Manjha : चिनी मांजाने घेतला निष्पाप तरुणाचा जीव, कामावरून परतत असताना झाला घात
delegation met the Governor on Monday
मुंडेंना अजितदादांचे अभय; पुरावा मिळेपर्यंत कारवाई न करण्याची भूमिका
India redflags Chinas 2 new counties
चीनने गिळंकृत केला लडाखचा एक प्रदेश, काय आहे प्रकरण?
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
india china loksatta news
चीनच्या कुरापतींवर भारताचे आक्षेप
Ramdas Athawale statement on Santosh Deshmukhs murder case
बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : रामदास आठवले

खडकी येथील बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप अँड सेंटरच्या (बीईजी) संचलन मैदानावर झालेल्या ‘आर्मी डे परेड’ची मानवंदना स्वीकारल्यानंतर जनरल द्विवेदी यांनी मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार, गौरवास्पद कामगिरी केलेले अधिकारी आणि तुकड्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

हेही वाचा >>> वाल्मीक कराडची वाकडमधील सदनिका सील करणार; पिंपरी महापालिकेचा निर्णय; दीड लाख रुपयांची थकबाकी

‘‘आर्मी डे परेड’ पुण्यात होण्याचे महत्त्व विशेष आहे. मराठा साम्राज्याच्या काळात पुणे हे शौर्य आणि संघर्षाचे प्रतीक होते. आज लष्कराच्या अनेक प्रमुख संस्था पुण्यात आहेत. पुणे परिसरात अनेक भारतीय बनावटीच्या लष्करी उपकरणांची निर्मिती होते. चार माजी लष्करप्रमुख आणि ४८ चक्र विजेते अधिकारी, सैनिक पुणे परिसरात वास्तव्याला आहेत. त्यामुळे पुण्याच्या समृद्ध वारशाशी लष्कराचा दृढ संबंध आहे,’ असे जनरल द्विवेदी यांनी सांगितले.

परिवर्तन दशककृती आराखडा

कार्यक्षमता, प्रशासकीय दक्षता वाढवणे, युद्धसज्जतेसाठी लष्कराने ‘परिवर्तन दशक’ या सूत्रानुसार कृती आराखडा तयार केला असून, लष्करासाठी २०२५ हे वर्ष परिवर्तनाचे आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठीचे असेल, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.

पश्चिमेकडे (पाकिस्तान) ताबारेषेवर शस्त्रसंधी कायम आहे. मात्र, घुसखोरीचे प्रयत्नही होत आहे. जम्मू-काश्मीरच्या अंतर्गत भागात संरक्षण दलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक आणि अमरनाथ यात्रा शांततेत पार पडणे हे तेथील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाल्याचेच निदर्शक आहे.

जनरल उपेंद्र द्विवेदीलष्करप्रमुख

Story img Loader