पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे २० लाखांची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. किरण रामभाऊ काकडे, चैतन्य राजेंद्र काकडे, आकाश शरद निकाळजे, नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे आणि सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडे बोल्हाई येथील जागेचा एका वाद सुरू होता. आरोपींनी गुगल प्ले स्टोअरवरून फेक कॉल अॅप डाऊनलोड करून घेतलं. त्यावरून अजित पवार यांचा मोबाइल क्रमांक वापरुन आरोपींनी बिल्डरला फोन लावला. यानंतर मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत आहे. वाडे बोल्हाई शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरमले यांच्यासह हेक्टर जमिनीचा वाद मिटवून टाका. बिल्डरला गावात पाय ठेवू देणार नाही आणि तुमचे कोणतेही यापुढे प्रोजेक्ट होऊ देणार नाही अशी धमकी देऊन २० लाखांची मागणी करण्यात आली.

महत्वाचं म्हणजे आरोपींना दोन लाख देण्यात आले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादी बिल्डरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर किरण रामभाऊ काकडे, चैतन्य राजेंद्र काकडे, आकाश शरद निकाळजे,नवनाथ भाऊसाहेब चोरमले,सौरभ नारायण काकडे आणि सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे या सहा आरोपींना अटक करण्यात आली. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six arrested for demaing ransom from builder on the name of maharashtra deputy cm ajit pawar svk 88 sgy