पिंपरीच्या मिलिंदनगर परिसरात ६ दुचाकी गाड्या जळल्याची घटना घडली आहे. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु अद्याप गाड्या जाळल्या गेल्या की, शॉर्ट सर्किटमुळे घटना घडली हे अस्पष्ट आहे. या घटने दुचाकीसह कपडे आणि घरातील साहित्य जळाले आहे. या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीच्या मिलिंदनगर परिसरातील कपिला हाऊसिंग सोसायटी येथील इमारतीच्या घरासमोर पार्क केलेल्या गाड्यांना पहाटे अचानक आग लागली. यामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानुसार तातडीने घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत ६ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

दरम्यान इमारतीच्या तळ मजल्याला घर आहेत.गाड्या लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील नागरिक आपापल्या घरासमोर दुचाकी पार्क करतात. पहाटे अचानक दुचाकी गाड्यांना आग लागली यात दुचाकीसह शेजारील घरातील कपडे आणि साहित्य जळाले आहे.यात ऐकून चार लाख रुपयांच नुकसान झालं आहे अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भगवान यमगर यांनी दिली आहे.दुचाकी गाड्या शॉर्ट सर्किटमुळे जळाल्या आहेत की काही समाज कंटकांनी पेटवून दिल्या हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.परंतु गाड्या पेटवून दिल्या असाव्यात असा संशय अग्निशमन दलाचे अधिकारी यमगर यांनी व्यक्त केला आहे.याचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six bikes burned in pimpri
Show comments