जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावे समाजमाध्यमावर आणखी एक बनावट खाते तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सहा बनावट खाते उघडण्यात आली असून, याबाबत डॉ. देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रारही दिली होती. सायबर चोरट्यांनी डॉ. देशमुख यांच्या छायाचित्रांचा वापर केला असून, आयएएस असा उल्लेख करून सहाव्यांदा बनावट खाते तयार केल्याचे उघडकीस आले आहे.
हेही वाचा >>> पुणे: रामटेकडी वसाहतीत गॅस गळती झाल्याने आग
बनावट खात्यांद्वारे चोरटे नागरिकांनी मैत्रीसाठी विनंती पाठवत आहेत. विनंती स्वीकारल्यानंतर पैशाची मागणी केली जात आहे. शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी याबाबतची माहिती देशमुख यांना दिली होती. त्यानंतर डाॅ. देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर बनावट खाते उघडण्याचे प्रकार सुरू आहेत. छायाचित्रांचा वापर करून समाजमाध्यमावर बनावट खाते उघडण्यात आले आहे. मैत्रीची विनंती पाठवून पैशांची मागणी करण्यात येत असल्याने नागरिकांनी अशा प्रकारच्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.