पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कौशल्याधारित शिक्षणासाठी अल्प मुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. त्यानुसार अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबवण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी कौशल्य विकास केंद्र, तज्ज्ञांची सल्लागार समिती स्थापन करणे आवश्यक असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, योग विज्ञान, डिजिटल विपणन असे एकूण २७ क्षेत्रांशी संबंधित अभ्यासक्रम राबवता येणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शिक्षण प्रक्रिया सर्वसमावेशक करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रात्यक्षिकावर आधारित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येण्यासाठी अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांची व्यवस्था करून कौशल्य प्रशिक्षण, कौशल्य अद्ययावतीकरण करण्याची कल्पना आहे. कार्यप्रशिक्षणाद्वारे शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यात सेतू निर्माण करण्यात येणार आहे. बारावी उत्तीर्ण असलेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांचा कालावधी तीन ते सहा महिन्यांच्या दरम्यान असेल. त्यात प्रामुख्याने व्यावहारिक शिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाईल.

Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी

हेही वाचा – ‘एमपीएससी’कडून ७८ पदांसाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

कौशल्य घटकामध्ये प्रयोगशाळा, कार्यशाळा आणि उद्योग परिसरात व्यावहारिक प्रशिक्षण समाविष्ट असेल. अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक गटात जास्तीत जास्त ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. अभ्यासक्रमाची मागणी आणि योग्य पायाभूत सुविधा, शिक्षकांच्या उपलब्धतेनुसार उच्च शिक्षण संस्था कोणत्याही अभ्यासक्रमाचे अनेक गट सुरू करू शकतात. तसेच स्थानिक गरजा, मागणीनुसार अभ्यासक्रम वाढवू शकतात. अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण संस्था नजीकच्या उद्योगांच्या सुविधांचा वापर करू शकतात. त्यासाठी सामंजस्य करार करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमांसाठी उच्च शिक्षण संस्था शिक्षक, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिक्स, उद्योगातील तज्ज्ञांची नियुक्ती करू शकतात. अल्प मुदत अभ्यासक्रमांमध्ये किमान १२ श्रेयांक, तर जास्तीत जास्त ३० श्रेयांकांचे अभ्यासक्रम राबवता येतील. त्यात दर आठवड्याला एक या प्रमाणे वर्गकार्याच्या १५ तासांसाठी एक श्रेयांक, तर दर आठवड्याला एक या प्रमाणे प्रात्यक्षिकांच्या तीस तासांसाठी एक श्रेयांक अशी रचना असेल. या अभ्यासक्रमांमध्ये ३० विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असणे आवश्यक आहे. विद्या परिषद आणि सक्षम प्राधिकरणामार्फत अभ्यासक्रमाची मान्यता प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमांचे शुल्क आणि शुल्क परतावा धोरण उच्च शिक्षण संस्थांनी स्वत:च्या संकेतस्थळावर जाहीर करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – पोषण आहारातील अंड्यांच्या दराच्या निर्णयात बदल? काय आहे नवा निर्णय?

२० जानेवारीपर्यंत मुदत

युजीसीने अल्प मुदतीचे कौशल्य अभ्यासक्रम राबवण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या मसुद्यावर २० जानेवारीपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.