सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सिम्बायोसिस लॉ स्कूलतर्फे इरासमस प्लस सीबीएचई प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील विविध शिक्षण मंडळाच्या शाळांतील शिक्षकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शिक्षकांमध्ये २१व्या शतकातील कौशल्याचा अभाव असल्याचे, तर विद्यापीठांमध्ये विद्यार्थिकेंद्रित रोजगारक्षम कौशल्य विकसन करण्याची गरज असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

सिम्बायोसिसमध्ये टीचर ट्रेनिंग विथ स्पेशलायझेशन ऑन लाइफ अँड टेक्नॉलॉजी स्किल्स ही परिषद १५ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, एसएलएस पुणेच्या संचालक डॉ. शशिकला गुरपूर, युनिव्हर्सिटी ऑफ लोन्नीनाच्या डॉ. कॅटरिना प्लाकिस्ती आणि विविध देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले.

हेही वाचा : पुणे : कामामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीची जबाबदारी मेट्रोची ; महापालिकेचे महामेट्रोला आदेश

परिषदेत भारतातील सिम्बायोसिस आणि बनस्थळी विद्यापीठासह कंबोडिया, ग्रीस आदी देशांतील नऊ विद्यापीठांचा सहभाग आहे. या प्रकल्पाअंतर्गत अध्यापन पद्धतीत बदल सूचवण्यासाठीचे संशोधन करण्यात येत आहे. या परिषदेत शिक्षण प्रणालीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा करण्यासह शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येईल.शिक्षक, प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सरकारला शिक्षक प्रशिक्षणाबाबत शिफारसींचा अहवाल सादर करण्यात येईल, असे डॉ. येरवडेकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skills shortage in teachers at twenty first century symbiosis law school pune print news tmb 01
Show comments