लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: जाहिरात फलक सहजपणे लोकांना दिसण्यासाठी पाच झाडे विनापरवानगी तोडण्यात आल्याचा प्रकार मोशी येथील बोऱ्हाडेवाडीतील शिवारोड येथे उघडकीस आला.

या प्रकरणी महापालिका उद्यान विभागाचे सहायक सुहास एकनाथ सामसे (वय ४७) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार साईराज जाहिरात फलक मालकाविरोधात झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा-पवना धरण भरले; मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शिवारोड येथील रॉयल पाम गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरील एक पिंपळाचे झाड, तसेच पदपथामधील चार झाडे तोडण्यात आली. साईराज एजन्सीचा जाहिरात फलक लोकांना दिसत नव्हता. त्यामुळे तो फलक नागरिकांना सहजपणे दिसण्यासाठी ही पाच झाडे विनापरवाना तोडण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slaughter of trees for billboards in moshi pune print news ggy 03 mrj
Show comments