राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांंमध्ये सुरू असलेल्या संघर्षांचे पडसाद पिंपरीतही उमटले. खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर ‘आप’ च्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यालयात घुसू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना अटकाव केला. त्यानंतर, आप तर्फे कार्यालयासमोरच झाडूद्वारे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आपचे नेते व माजी नगरसेवक मारूती भापकर, डॉ. श्याम अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाच्या वेळी आप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पिंपरीत आंदोलक आल्यानंतर पोलिसांनी त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ अटकाव करू दिला नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नव्हते म्हणून संभाव्य परिस्थिती टळली. आंदोलकांनी तेथेच झाडूद्वारे सफाई आंदोलन केले.

Story img Loader