विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहामध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या विषयावर चर्चा झाली, तेव्हा िपपरी-चिंचवड शहरातील तीनही आमदार गैरहजर होते, ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांनी एकत्र येऊन या विषयावर ठोस भूमिका घेण्याची गरज होती, अशी सूचक टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आकुर्डीत नगरसेवकांच्या बैठकीत केली.
पवार म्हणाले, ‘स्मार्ट सिटी’त समावेश होण्यास नवी मुंबईचा नकार असल्यास िपपरी-चिंचवडचा विचार व्हायला हवा. सर्व निकषात बसत असतानाही िपपरी-चिंचवडला डावलण्यात आले, याची खंत वाटते. सभागृहात ‘स्मार्ट सिटी’चा विषय चर्चेला आला तेव्हा शहरातील एकही आमदार उपस्थित नव्हता. वास्तविक त्यांनी या विषयावर आवाज उठवणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याच्या मुद्दय़ावर बोलताना, आपण कुठेतरी कमी पडलो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या बंदीच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात, चित्रपटाला अशाप्रकारे विरोध करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. हिंदूीतील मोठा निर्माता बाजीराव यांच्यावर चित्रपट बनवतोय, त्याचे कौतुक केले पाहिजे, अशी टिप्पणी त्यांनी केली. चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यादृष्टीने प्रयत्न करा, अशी सूचना त्यांनी केली, तेव्हा त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी अजितदादांना दिली.
‘स्मार्ट सिटी’वरील चर्चेत शहरातील तीनही आमदारांची ‘दांडी’
विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहामध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या विषयावर चर्चा झाली, तेव्हा िपपरी-चिंचवड शहरातील तीनही आमदार गैरहजर होते.
Written by दया ठोंबरे
First published on: 19-12-2015 at 02:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart city 3 mla absent