लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे या अर्जित रजा मंजूर नसतानाही परदेश दौऱ्यावर गेल्याचे समोर आले आहे. मागील तीन महिन्यांपासून त्या महापालिका सभांना गैरहजर आहेत. त्यामुळे त्यांचा महापालिकेतील प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आणून शासन सेवेत परत घ्यावे असे पत्र महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी राज्याच्या नगरविकास विभागाला पाठविले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत झगडे या ६ जानेवारी २०१८ मध्ये प्रतिनियुक्तीने सहाय्यक आयुक्त म्हणून रुजू झाल्या आहेत. नगरविकास विभागाने १ फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांना उपआयुक्तपदी बढती देत पालिकेच नियुक्ती दिली. झगडे यांचा महापालिका सेवेत पाच वर्षे पाच महिने कार्यकाळ झाला आहे. झगडे यांच्याकडे नागरी सुविधा केंद्र विभागाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अर्जित रजा मंजूरीबाबत अंतिम आदेश नसतानाही त्या परस्पर परदेशात गेल्याने कार्यालयात उपस्थित राहिल्या नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.
हेही वाचा…भारतीय मोहरीची जगभरात ‘मोहिनी’
तसेच त्या ५ एप्रिल २०२३ पासून प्रशासकांच्या महापालिका सभा, स्थायी समिती सभांना गैरहजर आहेत. प्रत्येक स्थायी समिती सभेत नागरी सुविधा केंद्राकडील विषयांबाबत आढावा घेण्यात येतो. त्यावेळी नागरी सुविधा केंद्र उपआयुक्त गैरहजर असतात. नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी दिल्यापासून त्या महापालिकेत अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा अहवाल नियंत्रण अधिकारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिला आहे. त्यामुळे झगडे यांचा महापालिका सेवेतील प्रतिनियुक्तीचा कालावधी तात्काळ संपुष्टात आणावा. त्यांना शासन सेवेत घ्यावे, असे आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे.