पुणे : पुण्यात “दो धागे-श्रीराम के लिए” या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुण्यातील मॉडेल महाविद्यालयाच्या मैदानावर आल्या होत्या. पण कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने त्या मंचावर गेल्याचं नाहीत आणि कार्यक्रम सोडून निघून गेल्या आहेत.
आणखी वाचा-पुणे : संस्कृत, प्राकृत हस्तलिखिते आता एका क्लिकवर
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील हे कार्यक्रम स्थळी आहेत. त्यापूर्वी स्मृती इराणी यांनी फर्ग्युसन रोडवर “दो धागे, श्रीराम के लिए” या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानावर पुणेकरांना स्मृती इराणी संबोधित करणार होत्या. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी केवळ २० ते ३० नागरिक उपस्थित होते. हे पाहून स्मृती इराणी मंचावर गेल्याचं नाहीत आणि उलट त्यांनी हा कार्यक्रम सोडून जाणं पसंत केलं.