गुजरातमध्ये राज्यसभेची उमेदवारी देत नरेंद्र मोदी यांनी मला खासदार केले. प्रारंभी मनुष्यबळ विकासमंत्री आणि आता वस्त्रोद्योगमंत्री अशी महत्त्वाची जबाबदारी सोपविली. मोदी राजकारणातून बाजूला होतील त्या दिवशी मीदेखील निवृत्त होईन, अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केली. अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा घेतील तो निर्णय मान्य असेल, असे सूचक विधान त्यांनी केले. चार पिढय़ा मतदारसंघातील शेतकऱ्यांकडे ज्यांनी बघितले नाही ते देशातील शेतकऱ्यांचे काय भले करणार, असा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी सवाल केला. प्रियांका गांधी यांचा त्यांनी सातत्याने ‘व्रढा’ असा उल्लेख केला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani will quit politics the day pm narendra modi modi hangs his boots