पुणे : गोव्यात विक्रीची परवानगी असलेल्या विदेशी मद्याची आंब्यांच्या पेट्यांमधून तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला. बारामतीतील मोरगाव – सुपा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत गोव्यातील १२ लाख ६१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या, तसेच मालवाहू वाहन (पिकअप) असा ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चाैघांना अटक करण्यात आली.

नामदेव हरीभाऊ खैरे, संदीप बबन सानप, गोरख भगवान पालवे, महेश गुलाबराव औताडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी संशय न येण्यासाठी गोव्यातील मद्याच्या बाटल्या पिकअप वाहनात ठेवलेल्या आंब्याच्या पेटीत लपवल्याचे उघडकीस आले. गोव्याहून नगरकडे पिकअप वाहन निघाले होते. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक उत्तम शिंदे, सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक माेरगाव – सुपा रस्त्यावर गस्त घालत होते. गाेव्यातील मद्याची तस्करी एका वाहनातून करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील दौंड विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर मुर्टी गावाजवळ पथकाने एका मोटारीसह पिकअप वाहनाची तपासणी केली. चौकशीत चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने पाहणी केली. तेव्हा पिकअप वाहनात मद्याच्या बाटल्या सापडल्या.

pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे

हेही वाचा – राज्यात पावसाची ओढ; कोकणपासून विदर्भापर्यंत उघडीप, तापमानवाढीने उन्हाचे चटके

हेही वाचा – ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल; ‘एमएचटी-सीईटी’चे निकाल जाहीर

आरोपींनी संशय येऊ नये म्हणून आंब्याच्या पेट्या ठेवल्या होत्या. पथकाने वाहनातील पेट्या बाहेर काढल्यानंतर मद्याची खोकी सापडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरूक, जवान शुभम भोईटे, केशव वामने यांनी ही कारवाई केली.