पुणे : ICC Men’s World Cup 2023 एकदिवसीय विश्वचषक  क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम वेळापत्रकाची प्रतीक्षा मंगळवारी अखेर संपली.  विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यास अवघे तीन महिने बाकी असताना हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील उद्घाटनाचा आणि समारोपाचा सामना अहमदाबादला मिळाला असून, कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पुणे शहराला पाच सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. तब्बल २७ वर्षांनी पुण्यात विश्वचषक सामन्याचे आयोजन होणार आहे. हे सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईत एका खास सोहळ्यात दुपारी १२ वाजता विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. अहमदाबाद, दिल्ली, मंबई, कोलकता या प्रमुख क्रिकेट शहरांच्या बरोबरीने पुण्याला विश्वचषक स्पर्धेत स्थान  मिळाले आहे. विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात यापूर्वीही झाले असले, तरी एकाच वेळेस इतक्या सामन्यांचे यजमानपद पुणे शहराला प्रथमच मिळाले आहे.

हेही वाचा >>> World Cup 2023: गेट सेट गो! वर्ल्डकप२०२३चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला

यापूर्वी, १९९६ मध्ये पुण्यात विश्वचषक स्पर्धेचा अखेरचा सामना खेळविण्यात आला होता. पुण्यातील तेव्हाच्या नेहरु स्टेडियमवर २९ फेब्रुवारी १९९६ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध केनया या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सामना स्पर्धेतील सर्वात सनसनाटी सामना ठरला होता. केनयाने या सामन्यात विंडीजवर विजय मिळवून क्रिकेट विश्वाला चकित केले होते.

हेही वाचा >>> पुणे : रिंगरोडच्या भूसंपादनाला गती; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

या वेळी आता पुणे शहराला यजमान भारतासह, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या सर्वच प्रमुख संघांच्या सामन्याचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. पुण्यातील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी भारत वि. बांगलादेश असा होईल. त्यानंतर पात्रता फेरीतील दुसरा संघ वि. अफगाणिस्तान (३० ऑक्टोबर), न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका (१ नोव्हेंबर), ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश (१२ नोव्हेंबर) असे  पुण्यातील अन्य सामने होणार आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश सामन्याने साखळी फेरीची सांगता होणार आहे.