पुणे : ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या आणि निराधार महिला व मुलांसाठी सेवा कार्य उभ्या करणाऱ्या समाजसेविका शोभना रानडे (वय ९९) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. सामाजिक कार्यासाठी केंद्र सरकारने २०११ मध्ये रानडे यांचा पद्मभूषण किताबाने गौरव केला होता. शोभना रानडे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९२४ रोजी पुण्यात झाला होता. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांची आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांच्या भेटीने शोभना यांनी आयुष्यभर गांधीवादी आदर्श स्वीकारले.

रानडे यांचे जीवन निराधार स्त्रिया आणि बालकांसाठी समर्पित होते. आसाममधील उत्तर लखीमपूर येथे १९५५ मध्ये त्या विनोबा भावे यांच्यासमवेत पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. मैत्रेयी आश्रम आणि शिशु निकेतनमधील पहिले बाल कल्याण केंद्र स्थापन करण्यात त्यांनी मदत केली. त्यांनी नागा महिलांना चरखा विणण्याचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबविण्यासाठी आदिम जाति सेवा संघ ही मोहीम सुरू केली . १९७९ मध्ये पुण्यात परतल्यानंतर आगाखान पॅलेस येथे असलेल्या गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आणि प्रशिक्षणासाठी एक संस्था स्थापन करण्यात मदत केली.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
maharashtra vidhan sabha election 2024, rashtrawadi congress sharad pawar,
पूर्व नागपुरात राष्ट्रवादीसमोर अडचणींचा डोंगर

हेही वाचा : धक्कादायक! हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीत पोलीस उपनिरीक्षक

गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या नेतृत्वाखाली रानडे यांनी १९९८ मध्ये कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय ही निराधार महिलांसाठी एक संस्था सुरू केली. त्याद्वारे महिलांना व्यापार आणि कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी पुण्यातील सासवड येथे स्थापन केलेला बालगृह आणि बालसदन हा आणखी एक बालकल्याण प्रकल्प सुरू केला. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून गंगा वाचवा चळवळ , गंगा नदीला प्रदूषणापासून वाचवण्याच्या मोहिमेमध्ये रानडे यांचाही सहभाग होता.

हेही वाचा : लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग; २३२ मिलिमीटर पावसाची नोंद, गेल्यावर्षीच्या एकूण पावसाचा रेकॉर्ड तुटणार

शोभना रानडे या कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट, गांधी स्मारक निधी, बालग्राम महाराष्ट्रच्या विश्वस्त, गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या सचिव, अखिल भारतीय महिला निरक्षरता निर्मूलन समिती, अखिल भारतीय महिला परिषद आणि भूदान ग्राम दान मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.

पुरस्कार आणि सन्मान

  • पद्मभूषण
  • जमनालाल बजाज पुरस्कार
  • रवींद्रनाथ टागोर पुरस्कार
  • राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार
  • प्राईड ऑफ पुणे पुरस्कार
  • बाल कल्याण कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार महात्मा गांधी पुरस्कार