अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने लोकसभा उमेदवारांना शिक्षण धोरणासंदर्भात आठ प्रश्न विचारले आहेत. या विषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांना सभेने निमंत्रित केले खरे. पण, राजकीय उमेदवारांची संभाव्य उपस्थिती ध्यानात घेता पोलिसांनी कार्यक्रमाच्या परवानगीसाठी निवडणूक आयोगाकडे बोट दाखविले आहे.
सभेतर्फे दरवर्षी महात्मा फुले जयंती ते आंबेडकर जयंती अशी शैक्षणिक व्याख्यानमाला घेण्यात येते. यंदा लोकसभेच्या सर्व उमेदवारांकडून त्यांची शिक्षणविषयक भूमिका जाणून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाची परवानगी मिळेल, अशी माहिती सभेचे संघटक प्रा. शरद जावडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. सुभाष वारे, दीपक पायगुडे आणि नाना क्षीरसागर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. प्रचाराच्या सभांमुळे कार्यक्रमास उपस्थित राहण्यासंदर्भात अनिल शिरोळे यांनी असमर्थता व्यक्त केली आहे. तर, विश्वजित कदम यांच्या स्वीय सहायकांना कार्यक्रमाची कल्पना देण्यात आली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
उमेदवारांना विचारलेले प्रश्न

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • – केजी ते पीजी शिक्षणासंदर्भात पक्षाचे धोरण
  • – नवा शैक्षणिक चातुर्वण्र्य कसा नष्ट करणार
  • – शिक्षणाचे बाजारीकरण कसे रोखणार
  • – शालेय आणि उच्च शिक्षणाच्या जादा संधी निर्माणासाठीच्या योजना
  • – सर्वच शिक्षण समान, मोफत आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या योजना
  • – शिक्षणातील विकृती कशा थांबविणार
  • – शिक्षणाचे जमातीकरण कसे थोपविणार
  • – राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती टक्के खर्च शिक्षणावर करणार

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Socialist professor assembly question candidate