दौंड परिसरात मजुरी करणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचे खून करणाऱ्या आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने पोलिसांनी जप्त केली. सामूहिक हत्याकांड प्रकरणात ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन उत्तम पवार (वय ४५), संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), राणी शाम फलवरे (वय २४), शाम पंडित फलवरे (वय २८), रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय ७), छोटू शाम फलवरे (वय ५), कृष्णा शाम फलवरे (वय ३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अशोक कल्याण पवार (वय ३९), शाम कल्याण पवार (वय ३५), शंकर कल्याण पवार (वय ३७), प्रकाश कल्याण पवार (वय २४), कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५, सर्व रा. ढवळे मळा, निघोज, ता. पारनेर, जि. नगर) यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – पुणे : श्वान आडवे आल्याने दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू, वाडिया महाविद्यालय परिसरातील अपघात

हेही वाचा – पुणे : ‘तू सुंदर दिसत नाहीस आणि…’ म्हणणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

सामूहिक हत्याकांड प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. आरोपींनी सात जणांचे खून करून मृतदेह भीमा नदीपात्रात टाकले. त्यासाठी एका मालवाहू गाडीचा (पिकअप जीप) वापर करण्यात आल्याचा संशय आहे. आरोपींकडून एक मालवाहू गाडी आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राहुल धस, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे तपास करत आहेत. सामूहिक हत्याकांड प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय असून त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.