राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, बहीण संजीवनी जयंत कोमकर आणि भाचा प्रकाश कोमकर यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
खून प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी आंदेकर यांचा मेहुणा जयंत कोमकर आणि त्यांचा भाऊ गणेश कोमकरला अटक करण्यात आली.न्यायालयाने कोमकर यांना ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.या प्रकरणात एकूण पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 03-09-2024 at 03:25 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Somnath gaikwad arrested in vanraj andekar murder case pune print news rbk 25 amy