(जेजुरी वार्ताहर) साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी ( दि.१३) भरणार असून खंडोबा गडातून देवाचा पालखी सोहळा सकाळी सात वाजता प्रस्थान ठेवणार आहे.दुपारी साडेबारा वाजता पवित्र कऱ्हा नदीवर खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना धार्मिक वातावरणात स्नान घालण्यात येणार आहे.

सोमवती अमावस्येच्या नियोजनासाठी गुरुवारी होळकरांच्या छत्री मंदिर परिसरात खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य इनामदार राजेंद्र पेशवे यांनी देवाची स्वारी सकाळी सात वाजता निघणार असल्याचे जाहीर केले.
रविवारी (दि. १२ )दुपारी तीन वाजता अमावस्या सुरू होत असून सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत अमावस्येचा कालावधी आहे.त्यामुळे जेजुरीत सोमवती यात्रेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद

नियोजनासंदर्भात पार पडली बैठक

या संदर्भात झालेल्या बैठकीसाठी पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत, देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे,विश्वस्त मंगेश घोणे, ऍड. पांडुरंग थोरवे, अभिजीत देवकाते,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सचिन पेशवे, संतोष खोमणे,छबन कुदळे, अशोक खोमणे,कृष्णा कुदळे,सुधीर गोडसे, अजिंक्य देशमुख, व्यवस्थापक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी .पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा,पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली असून पालखी मार्गाच्या पायऱ्यावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत सांगितले.

खांदेकऱ्यांना ड्रेसकोड

मागच्या सोमवती यात्रेत खंडोबा गडावर पालखी उतरताना अपघात होऊन सहा जण जखमी झाले होते. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. पालखीला खांदा देणाऱ्या खांदेकार्‍यांना वेगळा ड्रेस कोड देण्यात आला आहे. तेराशे खांदेकार्‍यांना अशा पद्धतीचे टी-शर्ट दिले असून त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना खांदा देता येणार नाही असे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे आणि सांगितले.

भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवर पोलीस कारवाई होणार

सोमवती यात्रेच्या निमित्ताने जेजुरीत मोठ्या प्रमाणात भंडार खोबऱ्याची विक्री होते.भंडाऱ्याला मागणी भरपूर असल्याने काही बाहेरील व्यापारी यात्रेत भेसळयुक्त भंडारा विक्रीसाठी आणतात, हा भंडारा बनावट असून यामध्ये विविध रसायनांचा वापर केला जातो. पालखी सोहळा सुरू झाल्यावर शेकडो पोती भंडाऱ्याची उधळण येथे केली जाते. या भेसळयुक्त भंडाऱ्यावर बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थ मंडळाने केली होती या भंडार्‍याचा भाविकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने कोणीही बनावट भंडारा विकू नये विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल,अशा नोटिसा भंडार खोबरे विक्रेतांना देण्यात आल्याची माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी दिली.

Story img Loader