चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनोरुग्ण मुलाने आईचा गळ्यावर कात्रीने वार करत खून केल्याची घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे या अगोदर देखील मुलाने आईच्या डोळ्या शेजारी सुरीने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, एकुलता एक मुलगा असल्याने पोलिसांकडे तक्रार केली नाही. सुमन सावंत वय-६० अस खून झालेल्या आईचे नाव असून भुपेंद्र सावंत वय-४० अस मनोरुग्ण आरोपी मुलाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोरुग्ण भुपेंद्र याने आज सकाळी आई सुमन हिच्या गळ्यावर कात्रीने वार करून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आई ला पाहून त्याने घराच्या पाठीमागील दरवाजातून पळ काढला. सकाळ पासून दरवाजा का उघडला नाही हे पाहण्यासाठी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर सुमन यांचा खून झाल्याचे उघड झाले. तात्काळ त्यांनी चिंचवड पोलिसांना याची माहिती दिली. आरोपी हा सुमन यांचा एकुलता एक मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी मयत सुमन यांच्या पतीचे निधन झाले. तसेच काही महिन्यांपूर्वी सुमन यांच्या डोळ्या शेजारी सुरी खुपसून खून करण्याचा प्रयत्न मनोरुग्ण मुलगा भुपेंद्र ने केला होता. पोलिसांनी त्यांच्याकडे धाव देखील घेतली. परंतु, त्यांनी प्रेमापोटी मुलाची तक्रार पोलिसात दिली नव्हती. भुपेंद्र हा फरार असून त्याचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son killed his mother in chinchwad