वडिलांच्या निधनानंतर आईच्या बँक खात्यातील ११ काेटी ४० लाख २८ हजार रुपयांवर सावत्र मुलानेच डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औंध परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील सावत्र मुलाने परस्पर या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावर तब्बल दाेन वर्षांनी मुकुंद अशाेक कैरे (वय५१, रा.नाेएडा, उत्तर प्रदेश) याच्यावर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – “चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर मी ठाम”, अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंची भूमिका; महाविकास आघाडीला दिला ‘हा’ पर्याय

हेही वाचा – देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, कसब्यात रवींद्र? काँग्रेसच्या घोषणेने भाजपाच्या गोटात खळबळ

आरती अशाेक कैरे (वय ७०) यांनी याबाबत चतुश्रृंगी पाेलीस ठाण्यात सावत्र मुलाविराेधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना २०२० ते २०२२ या दरम्यान घडली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंद कैरे हा तक्रारदार यांचा सावत्र मुलगा आहे. त्यांचे पती अशाेक कैरे यांनी पत्नीच्या भविष्यासाठी म्युच्युअल फंड खात्यातील गुंतवणुकीतील एकूण रक्कम ११ काेटी ४० लाख २८ हजार रुपये ही त्यांच्या बँकेत ठेवली हाेती. सावत्र मुलाने ऑगस्ट २०२० मध्ये अशाेक कैरे यांच्या नावाचा बनावट ईमेल आयडी तयार केला. त्याद्वारे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड खात्याचा अशाेक कैरे यांचा नाेंदणीकृत माेबाईल क्रमांक बदलून त्यात आराेपीने स्वत:चा माेबाईल क्रमांक टाकला. ताे माेबाईल क्रमांक अशाेक कैरे यांचाच असल्याचे भासवून नोंदणीकृत केला. त्यानंतर त्याने गैरवापर करून सदर म्युच्युअल फंड खात्यातील सर्व रकमा स्वत:च्या बँक खात्यात जमा करून घेत फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी सहकारनगर पाेलीस ठाण्याचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस. झरेकर पुढील तपास करत आहेत.

Story img Loader