पुणे : अपघातात गंभीर जखमी झाल्याने मेंदू मृत घोषित केलेल्या अकरा वर्षांच्या मुलामळे इतर तीन मुलांना नवजीवन मिळाले आहे. या मेंदू मृत मुलाची दोन्ही मूत्रपिंडे आणि हृदय अशी तीन अवयवयांचे प्रत्यारोपण करण्यात आले. अवयवांचे प्रत्यारोपण झालेल्या तिन्ही मुलांची प्रकृती आता स्थिर आहे.

सातारा येथील एका मुलाचा अपघात घडला होता. त्याला उपचारासाठी तेथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला सातारा येथून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी या मुलाला मेंदू मृत घोषित केले. मेंदू मृत मुलाचे कुटुंबीय मूळचे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. सध्या ते सातारा येथे शेत मजुरीचे काम करतात. रुग्णालयातील समुपदेशकांनी केलेल्या अवयवदानाच्या आवाहनास मुलाच्या पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
deceased Raghunandan Jitendra Paswan
बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

यानंतर पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने नियमांनुसार अवयवांचे वितरण केले. या मुलाच्या अवयवदानातून प्राप्त झालेले एक मूत्रपिंड कमांड हॉस्पिटलमधील रुग्णाला आणि दुसरे सिम्बायोसिस हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आले. मुलाचे हृदय डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील एका रुग्णाला देण्यात आले. या तिन्ही रुग्णांवर अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

चालू वर्षातीत तिसरे अवयवदान

पुणे विभागात चालू वर्षातील हे तिसरे मरणोत्तर अवयवदान ठरले आहे. सातारा येथील सरकारी रुग्णालय अवयवदानासाठी नोंदणीकृत नसल्याने या मुलाला ससूनमध्ये आणण्यात आले. त्यामुळे हे अवयवदान होऊ शकले. या अवयवदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत मुलाचे पालक, पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती, ससून सर्वोपचार रुग्णालय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.