घरातील दागिने गहाण ठेवले की विकले, याबाबत आईने जाब विचारल्याचा राग आल्याने मुलाने आईवरच चाकूने वार केले. ही घटना थेरगाव येथे घडली. ओंकार ईश्वर बामणे (वय १९, रा. १६ नंबर, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांची दोन मुले एकत्र राहतात. ओंकार हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुण्यात पोलिसांकडून घृणास्पद प्रकार : पोलीस चौकीत महिलेला बेदम मारहाण, पिण्यास पाणी मागितले, तर लघुशंका प्यायला…

ओंकारने दागिने घेतले किंवा कुठे तरी ठेवले, असा आईचा संशय होता. त्यामुळे तिने ओंकारला दागिन्यांबाबत विचारणा केली. ‘तू दागिने विकले की गहाण ठेवले, दागिने कोठे आहेत’ असा जाब विचारून, सांग नाही तर पोलिसांना बोलावीन असे धमकावल्याचा राग आल्याने ओंकारने ‘तू जिवंत राहिलीस तर पोलिसांना बोलावशील’ असे म्हणत घरातील चाकूने आईच्या डोक्यावर व हातावर वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फौजदार पोटे तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son stabbed mother after she asking about the jewellery pune print news ggy 03 zws