पुणे : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या व्हाॅईस लेअर सायकाेलाॅजिकल ॲनलिसिस चाचणीस परवानगी मिळवण्यासाठी सरकार पक्षाकडून शुक्रवारी न्यायालयात लेखी युक्तीवाद सादर करण्यात आला.

अतिरिक्त सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी न्यायालयात लेखी युक्तीवाद सादर केला. व्हाॅईस लेअर सायकाेलाॅजिकल ॲनलिसिस चाचणीसाठी कुरुलकर यांच्या संमतीची आवश्यकता नाही. तपासाला दिशा मिळावी, यासाठी ही चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या चाचणीला परवानगी मिळावी, असे  ॲड. फरगडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या लेखी युक्तीवादात म्हटले आहे.

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
11 thousand crores to BEST in the last decade Mumbai Municipal Corporation administration rejects allegations of treating the initiative with contempt Mumbai print news
गेल्या दशकात ‘बेस्ट’ला ११ हजार कोटी; उपक्रमाला सापत्न वागणूक दिल्याचा आरोप मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अमान्य

कुरुलकर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात नमूद केलेली कागदपत्रे अद्याप मिळालेली नाही. त्यातील बरेच जबाब लाखबंद (सील) आहेत. त्यामुळे जबाबात नेमके काय आहे, याबाबतची माहिती मिळाल्यास युक्तीवाद करणे सोपे होईल, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. ऋषीकेश गानू यांनी दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. कुरुलकर यांच्या व्हाॅईस लेअर सायकाेलाॅजिकल चाचणीवर २ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

कुरुलकरांकडून असहकार

दरम्यान, राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांकडे व्हाॅईस लेअर सायकाॅलोजिकल चाचणीबाबत न्यायालयाने विचारणा केली होती. यापूर्वी ही चाचणी झाली होती का? अशी विचारणा न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, एटीएसच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक माहिती देता आली नव्हती. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी या चाचणीवर सुनावणी घेण्यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे देण्यास सांगितले होते. त्यानुसार सरकारी वकील ॲड. फरगडे यांनी व्हाॅईस लेअर ॲनलिसिस आणि सायकाेलाॅजिकल चाचणी करणे का आवश्यक आहे, याबाबत न्यायालयात लेखी युक्तीवाद सादर केला आहे. कुरुलकर तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याने ही चाचणी करणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाच्या वकिलांनी सांगितले होते.

Story img Loader