पुणे : दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या बंगळुरू विभागातील साई पी निलयम ते बसमपल्ले स्थानकांदरम्यान वाहतूक, वीज यंत्रणेसह अनेक कामे केली जाणार आहेत. हे काम सुरू झाले असून ते ८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

१) बंगळुरूहून सुटणारी बंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई उद्यान एक्स्प्रेस २ फेब्रुवारीपर्यंत पेनुकोंडा – नागसमुद्रम – धर्मावरम या बदललेल्या मार्गाने धावेल. साई पी निलयम स्थानकावर ती जाणार नाही.
२) तिरुअनंतपुरम येथून दर शनिवारी सुटणारी तिरुअनंतपुरम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस गाडी २३, ३० डिसेंबर आणि ६, १३, २०, २७ जानेवारी, ३ फेब्रुवारी तिरुपती – जोलारपेट्टे – रेनिगुंठा – गुंटकल या बदललेल्या मार्गाने धावेल. यामुळे बंगारपेट, कृष्णराजपुरम, हिंदूपूर, धर्मावरम आणि अनंतपूर स्थानकांवर ती जाणार नाही.

दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Mumbai Western Railway Jumbo Block
जम्बो ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल; अंधेरी, बोरीवली स्थानकांवर प्रचंड गर्दी
traffic , Dombivli, rickshaw , handcart sellers,
डोंबिवलीत वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या ४० हातगाडी विक्रेते, रिक्षा चालकांवर कारवाई
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai, Traffic changes at BKC, traffic congestion,
मुंबई : बीकेसी येथे वाहतुकीत बदल, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतुकीत बदल
Missing tempo driver, Narayangaon accident,
पुणे : नारायणगाव अपघात प्रकरणातील पसार टेम्पोचालक गजाआड, एसटी बसचालकही अटकेत
Traffic police launch special campaign for footpath freedom in Nagpur
नागपुरातील पदपथावरील दुकानांवर संक्रात…वाहतूक पोलिसांनी ‘फुटपाथ फ्रिडम’…

हेही वाचा : “…तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही”, शरद पवार यांचा निर्धार

३) कोईमतूर येथून सुटणारी कोईमतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २ फेब्रुवारीपर्यंत सालेम – जोलारपेटे – रेनिगुंथा – गुंटकल या बदललेल्या मार्गावर धावेल. यामुळे ती धर्मपुरी, होसूर, बंगळुरू कॅन्टोन्मेंट, बंगळुरू, गौरीबिदनौर, साई पी निलयम, धर्मावरम आणि अनंतपूर स्थानकांवर जाणार नाही.

४) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस ७ फेब्रुवारीपर्यंत धर्मावरम – नागसमुद्रम – पेनुकोंडा या वळवलेल्या मार्गे धावेल. त्यामुळे ती साई पी निलयम स्थानकावर जाणार नाही.

५) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी गाडी क्रमांक १६३३१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – तिरुवनंतपुरम एक्सप्रेस १७, २४, ३१ डिसेंबर आणि ७, १४, २१, २८ जानेवारी आणि ४ फेब्रुवारी रोजी दर रविवारी जोलारपेटे – तिरुपती या बदललेल्या मार्गाने धावेल. यामुळे ती हिंदूपूर, कृष्णराजपुरम आणि बंगारपेट स्थानकांवर जाणार नाही.

६) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस – कोईमतूर एक्स्प्रेस ७ फेब्रुवारीपर्यंत गुंटकल-रेनिगुंठा-जोलारपेटे-सालेम या बदललेल्या मार्गाने धावेल त्यामुळे ती अनंतपूर, धर्मावरम, साई पी निलयम, हिंदूपूर, गौरीबिदनूर, बंगळुरू कॅन्टोन्मेंट, बंगळुरू, होसूर आणि धर्मपुरी स्थानकांवर जाणार नाही.

हेही वाचा : पंचविसाव्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाची लढाई; डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ९३ दिवसांनी अखेर यशस्वी

७) बेंगळुरूहून दर रविवारी सुटणारी साप्ताहिक गाडी बंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस २४, ३१ डिसेंबर आणि ७, १४, २१ व २८ जानेवारी रोजी, यशवंतपूर – अर्सिकेरे – हुबळी या वळवलेल्या मार्गाने धावेल. यामुळे ती हिंदूपूर, धर्मावरम , अनंतपूर, गुंतकल, बेल्लारी, होस्पेट, कोप्पल आणि गदग स्थानकांवर जाणार नाही.

८) बंगळुरूहून दर शुक्रवारी सुटणारी साप्ताहिक गाडी बंगळुरू – अजमेर एक्स्प्रेस २२, २९ डिसेंबर आणि ५, १२, १९ व २६ जानेवारी रोजी यशवंतपूर – अर्सिकेरे – हुबळी या वळवलेल्या मार्गाने धावेल. यामुळे ती हिंदूपूर, धर्मावरम, अनंतपूर, गुंतकल, बेल्लारी, होस्पेट, कोप्पल आणि गदग स्थानकांवर जाणार नाही.

९) कोईमतूरहून दर शुक्रवारी सुटणारी साप्ताहिक गाडी कोईमतूर – राजकोट एक्सप्रेस २२, २९ डिसेंबर आणि ५, १२, १९ व २६ जानेवारी रोजी सेलम – तिरुपती – जोलारपेटे – रेनिगुंठा – गुंटकल या वळवलेल्या मार्गाने धावेल. यामुळे ती बंगारपेट, कृष्णराजपुरम, हिंदूपूर, धर्मावरम, अनंतपूर आणि गुत्ती स्थानकांवर जाणार नाही.
१०) तुतीकोरीनहून दर रविवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक १९५६७ तुतिकोरिन – ओखा एक्सप्रेस १७, २४, ३१ डिसेंबर आणि ७, १४, २१ आणि २८ जानेवारी रोजी सालेम – जोलारपेट्टई – रेनिगुंठा – गुंतकल या वळवलेल्या मार्गाने धावेल. यामुळे ती बंगारपेट, कृष्णराजपुरम, येलहांका, हिंदूपूर, धर्मावरम आणि अनंतपूर स्थानकांवर जाणार नाही.
११) अजमेरहून दर सोमवारी सुटणारी साप्ताहिक गाडी अजमेर – बंगळुरू एक्स्प्रेस १८, २५ डिसेंबर आणि १,८,१५, २२ व २९ जानेवारीला हुबळी – अर्सिकेरे – यशवंतपूर या बदललेल्या मार्गाने धावेल. त्यामुळे ती गदग , कोप्पल, होस्पेट, बेल्लारी, गुंटकल, अनंतपूर, धर्मावरम आणि हिंदूपूर स्थानकांवर जाणार नाही.

हेही वाचा : राज्यात थंडी कमी होण्याचा अंदाज

१२) जोधपूरहून दर बुधवारी सुटणारी साप्ताहिक गाडी जोधपूर-बेंगळुरू एक्स्प्रेस २०, २७ डिसेंबर आणि ३,१०,१७,२४ व ३१ जानेवारी हुबळी-अर्सिकेरे- यशवांपुर या वळवलेल्या मार्गाने धावेल. यामुळे ती गदग ,कोप्पल, होस्पेट, बेल्लारी, गुंटकल, अनंतपूर, धर्मावरम आणि हिंदूपूर स्थानकांवर जाणार नाही.

१३) राजकोटहून दर रविवारी सुटणारी साप्ताहिक गाडी राजकोट-कोइमतूर एक्स्प्रेस १७, २४, ३१ डिसेंबर आणि ७, १४, २१, २८ जानेवारी रोजी गुंटकल-रेनिगुंठा-जोलारपेट्टे- तिरुपती – सालेम या बदललेल्या मार्गाने धावेल. यामुळे ती गुत्ती, अनंतपूर, धर्मावरम, हिंदूपूर, कृष्णराजपुरम आणि बंगारपेट स्थानकांवर जाणार नाही.

१४) ओखाहून दर शुक्रवारी सुटणारी साप्ताहिक गाडी ओखा- तिरुनेलवेली एक्स्प्रेस १४, २२, २९ डिसेंबर आणि ५, १२, १९, २६ जानेवारी रोजी गुंटकल- रेनिगुंठा- जोलारपेट- सालेम या बदललेल्या मार्गाने जाईल. यामुळे ती अनंतपूर, धर्मावरम, हिंदूपूर, येलहांका, कृष्णराजपुरम आणि बंगारपेट स्थानकांवर जाणार नाही.

Story img Loader