पुणे : मोसमी पाऊस लांबल्यामुळे राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला असून अद्याप खरिपाच्या दोन टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. धूळवाफ पेरण्या झालेल्या ठिकाणी दुबार पेरणीचे सावट आहे. राज्यात १६ जूनपर्यंत सरासरी ११३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात सहाच मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे सगळा खरीप हंगामच अडचणीत आला आहे.

राज्यात खरीप हंगामात सुमारे १५० लाख हेक्टरवर लागवड होते. १८ जूनपर्यंत जेमतेम ९० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी धूळवाफ पेरणी होते. या पेरण्याही अडचणीत आल्या आहेत. पाऊस आणखी लांबल्यास कडधान्यांच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मोसमी पाऊस अद्याप तळकोकणातही सक्रिय झालेला नाही. हवामान विभागाच्या चार आठवडय़ांच्या सुधारित अंदाजानुसार राज्यात पाऊस सुरू होण्यास २३ जुलै उजाडणार आहे. त्यानंतर पुरेसा पाऊस होऊन वाफसा येईपर्यंत पेरण्या करता येणार नाहीत.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार

विदर्भात कपाशी, सोयाबीन संकटात

विदर्भात खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन ही पिके मोठय़ा प्रमाणावर घेतली जातात. जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापासून पेरणी सुरू होते. मात्र अद्याप पावसाला सुरुवात झाली नसल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. विदर्भात खरीप हंगामाच्या पेरण्यांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. मात्र, पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या व काही ठिकाणी धूळवाफ पेरणीही झाली. याचे प्रमाण केवळ तीन टक्के आहे. नागपूर व अमरावती विभाग मिळून एकूण ५० लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी अमरावती विभागाचे ३१ लाख ५८ हजार हेक्टर तर नागपूर विभागाचे क्षेत्र १९ लाख हेक्टर आहे. येथे आतापर्यंत तीन ते पाच टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १९३७ हेक्टरसह इतरही ठिकाणी शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरण्या केल्या आहेत. मात्र तापमान वाढल्याने पेरणी उलटण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मशागतही नाही

पश्चिम महाराष्ट्रातही अद्याप पेरण्यांना सुरुवातच झालेली नाही. वळीव पाऊसही न झाल्यामुळे उन्हाळी मशागतीही रखडल्या आहेत. कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांची पाणी पातळी खालावल्यामुळे आणि पिण्याच्या पाण्याची तजवीज करण्यासाठी अनेक ठिकाणी उपसा बंदी करण्यात आल्यामुळे नदीकाठावरही पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. पावसाअभावी उसाच्या लागवडीही खोळंबल्या आहेत. सह्याद्री घाटाच्या परिसरात धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत. पण, उष्णतेत वाढ झाल्यामुळे धूळवाफ पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. नदीकाठावर होणारा सोयाबीनचा पेराही अडचणीत आला आहे.

मराठवाडय़ात पावसाची प्रतीक्षा

मृग नक्षत्र अर्धे संपून गेले तरीही मराठवाडय़ातील पेरण्या पूर्णपणे रखडल्या आहेत. काही ठिकाणी मागील पंधरा दिवसांत मृगाचे दोन पाऊस झाले आहेत. पण, पेरणीसाठी पुरेशी ओल झालेली नाही. मराठवाडय़ात जेमतेम एक ते दोन टक्क्यांपर्यंतच पेरण्या झाल्याचा अंदाज आहे. काही शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी केली आहे. मात्र, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आल्यामुळे शेतकरीही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

उत्तर महाराष्ट्रात लागवड रखडली

पावसाअभावी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात खरिपाची पेरणी रखडली आहे. ७५ मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तितका पाऊस नाशिक जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे पेरणी होऊ शकली नसल्याचे जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांची बागायती कपाशीची पेरणी सुरू आहे. धुळे व नंदुरबारमध्येही चांगल्या पावसाअभावी पेरण्या लांबल्या आहेत.

डाळी महागण्याची भीती

’राज्यात कडधान्याचे क्षेत्र सुमारे २०.५३ लाख हेक्टर आहे. त्यात तुरीचे सुमारे १३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. अपेक्षित पाऊस झाल्यास साधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पेरण्या सुरू होतील.

’१५ जुलैपर्यंत कडधान्यांची पेरणी करता येईल. त्यानंतर मूग, उडीद आणि भुईमुगाची पेरणी करू नये, अशी कृषी विभागाचीच शिफारस आहे.

’तूर वगळता अन्य कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कडधान्याची उपलब्धता कमी होऊन डाळींचे दर भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

Story img Loader