लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: मुळशी येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलने राज्यात पहिली अंतराळ शिक्षण प्रयोगशाळा स्थापन केली आहे. या प्रयोगशाळेत चंद्रयान, मंगळयानसह विविध उपग्रहांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अवकाश प्रयोगशाळा प्रक्षेपण विज्ञान, उपग्रह, ड्रोन, रोबोटिक्स, आभासी वास्तव (व्हीआर), त्रिमितिय मुद्रण तंत्रज्ञान अशा तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम राबवले जाणार असून, प्रयोगशाळेचे उद्घाटन शुक्रवारी (२१ एप्रिल) होणार आहे अशी माहिती शाळेचे संचालक कुणाल भिलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

व्योमिका स्पेस अकादमीचे संस्थापक गोविंद यादव, अकादमीचे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रतीक मुणगेकर, शाळेच्या प्रशासकीय व्यवस्थापिका यशस्विनी भिलारे, प्राचार्या रेणू पाटील आदी या वेळी उपस्थित होते. व्योमिका स्पेस अकादमीने इस्रोच्या स्पेस ट्यूटरच्या माध्यमातून या प्रयोगशाळेची स्थापना केली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि ज्येष्ठ इस्रोचे अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. टी एन सुरेश कुमार यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा…. पुणे- गोरखपूर दरम्यान धावणार उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या

पुष्पक यान, गरुड विमान, गगन विमान यासारखी लहान रेडिओ नियंत्रित विमाने, व्योमिका स्पेसने निर्मिती केलेले ड्रोनही प्रयोगशाळेत उपलब्ध करण्यात आले आहेत. दोन दुर्बिणींद्वारे अंतराळात घडणाऱ्या विविध घटनांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Space education laboratory in school at mulshi pune pune print news ccp 14 dvr
Show comments