पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १८ ते २२ डिसेंबर असे पाच दिवस रात्रपाळीत या बस विविध मार्गांवरून धावणार असल्याची माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाने दिली.
सवाई गंधर्व भीमसन महोत्सवाचे यंदा ७० वे वर्ष आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुल येथे हा महोत्सव होणार आहे. दरवर्षीप्रमाणे सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला जाणाऱ्या पुणे, पिंपरी चिंचवड भागातील श्रोत्यांसाठी पीएमपीकडून विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार रात्री उशिरा कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी पीएमपीकडून २५ टक्के जादा दर आकारला जाणार आहे. १८ ते २० आणि २२ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता, तर २१ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजता मुकुंदनगर येथून या बसच्या मार्गांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
हेही वाचा – पुणे : खड्डे मुक्त रस्ता अशी ओळख जपणारा जंगली महाराज रस्ता खचला? नक्की काय झाले?
हेही वाचा – पुणेकर सावधान! रस्त्यांवरून धावताय मृत्यूचे सापळे, प्रवाशांचा जीव धोक्यात?
u
असे असणार वेळापत्रक
- मुकुंदनगर ते निगडी भक्ती शक्ती : दांडेकर पूल, डेक्कन बाकडेवाडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड स्थानक
- मुकुंदनगर ते धायरी मारुती मंदिर : दांडेकर पूल, विठ्ठलवाडी, आनंदनगर, वडगांव फाटा, धायरी गांव
- मुकुंदनगर ते कोथरूड डेपो : टिळक रस्ता, डेक्कन काॅर्नर, पौड फाटा, जयभवानीनगर, वनाज कंपनी
- मुकुंदनगर ते वारजे माळवाडी : डेक्कन काॅर्नर, पौड फाटा, कोथरूड स्थानक, गांधी भवन, कर्वेनगर